कोरोना : औरंगाबाद जिल्ह्यात ६१९ रूग्ण कोरोनाबाधित; बळींची संख्या १३ वर

औरंगाबाद वृत्तसंस्था । राज्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. औरंगाबादमध्येही कोरोनाचा कहर सुरु केला आहे. जिल्ह्यात ६०० च्यावर कोरोना रुग्णांचा आकडा गेला आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत ६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६१९ वर पोहोचली आहे, अशी माहिती निवासी वैद्याकीय अधिकारी यांनी दिली.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

रविवारी एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या १३ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला रुग्ण हा रोशन गेट परिसरात राहणारा रहिवाशी आहे. त्याला मधुमेह आणि किडनीचाही आजार होता. काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर बाधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला. गेल्या 15 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. हा आकडा थेट सहाशेच्या घरात पोहोचला. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे.

Protected Content