यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या परसाडे ग्रामपंचायत व्दारे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
नऊ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत परसाडे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आदिवासी अनुसूचित क्षेत्र ग्रामपंचायत मध्ये जागतिक आदिवासी अस्मिता दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी संशोधन संस्था पुणे यांच्यामार्फत वीर आदिवासी क्रांतिकारक व समाज सुधारक यांचे तेल चित्र व त्याच्या सोबत त्यांनी केलेल्या कर्तुत्वाची व स्वातंत्र्याच्या कार्यात त्यांनी केलेल्या लढाईची स्मरण उत्कृष्ट अशी माहिती जनतेसाठी व आदिवासी ग्रामस्थांसाठी आठवणीत ठेवण्याच्या उपयोगात येणारी लोकांना वाचनास उपलब्ध करून देण्यात आली व सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी थोर क्रांतिकारकांच्या प्रतिमांची पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले आणि जागतिक आदिवासी अस्मिता दिवस साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी ग्रामपंचायतचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामसेवक मजीत अर्मान तडवी, माजी सरपंच हुसेन सायबु तडवी, माजी उपसरपंच रमेश सावडे माझी व्हाईस चेअरमन अरमान सुपडू तडवी सुलेमान तडवी, जहांगीर तडवी, शब्बीर रुबाब तडवी, कमाल तडवी, लालका तडवी ,सावका तडवी, अजित तडवी, मुबारक तडवी, मधुकर भालेराव ,राजू तडवी, सुमित तडवी, सिकंदर तडवी, दीपक पाटील, पंढरी सुरडकर ,समाधान भालेराव, मोनू तडवी, समीर तडवी शेरका तडवी, रमजान तडवी ,रियाज तडवी, सद्दाम तडवी ,मुबारक तडवी, जीवन धनके, बशीर तडवी, बिल्ला तडवी, बाबासाहेब भालेराव ,इनुस तडवी, दिलीप सोनवणे यांच्यासह संख्या आदिवासी बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.