पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील बायपास हायवे लगत रेल्वे उड्डाणपुला जवळ असलेले वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर पाचोरा तालुक्यातील “काही प्रमुख राजकीय व्यक्ती व काही तोडी पाणी वाले पत्रकार” असा शब्द प्रयोग करून सोशल मिडीयावर पोस्ट प्रसारीत केली असुन सदर प्रकरणी ६ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी पत्रकारांची बैठक होऊन यात सदर डॉक्टर विरोधी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेऊन निषेध नोंदवण्यात आला आहे.

व डॉ. निळकंठ पाटील यांच्याकडे कोणत्याही पत्रकाराने तोडी- पाणीसाठी प्रयत्न केला असेल अथवा वारंवार प्रतिमा मलिन करत असतील किंवा प्रयत्नात असतील तर त्यांचीही दखल घेऊन संबधित दोषींवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही व्हावी. यासोबतच पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये १ फेब्रूवारी २०२३ रोजी फुलचंद बडगुजर यांनी आपल्या मुला संदर्भात योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे वृंदावन हॉस्पिटल संचालका विरोधात पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला असुन त्या अर्जाची देखील सखोल चौकशी होऊन दोषीवर १५ फेब्रुवारी पावेतो गुन्हा दाखल व्हावा अन्यथा दि. १६ फेब्रूवारी पासुन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेणार असल्याचे ३० पत्रकारांच्या सहया असलेले निवेदन वजा तक्रार अर्ज पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. सदरचे निवेदन वजा तक्रारी अर्ज पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे व योगेश गणगे यांनी स्विकारले.

Protected Content