पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून सासूची गोळ्या घालून हत्या !

Gun fires

पारनेर (वृत्तसंस्था) पत्नीला सासरी नांदायला पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने गोळ्या झाडून चक्क सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे गावात घडली. या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविता सुनील गायकवाड (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

आरोपी राहुल गोरख साबळे (रांधे, तालुका- पारनेर) याचा सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता हिच्याशी दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. सहा महिने संसार केल्यानंतर घरच्यांचा विरोधामुळे अस्मिता माहेरी राहत होती. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास राहुलने घरी जाऊन सविता गायकवाड यांना जाब विचारला. तिथे शाब्दिक वाद वाढल्यानंतर राहुलने रागाच्या भरात स्वतः कडील पिस्तूल काढून सविता गायकवाड यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. ग्रामस्थांनी जखमी अवस्थेतील सविता गायकवाड यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. आरोपी राहुल साबळे यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content