पंतप्रधान मोदी साधणार शेतकऱ्यांशी संवाद

 

लखनऊ, वृत्तसंस्था । शुक्रवार २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उत्तर प्रदेशातील अवधच्या शेतकर्‍यांशी पंतप्रधान मोदी नवीन कृषी कायद्यांचे फायदे सांगतील. यासह उत्तर प्रदेश भाजपचे कार्यकर्ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना देतील. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांच्या अडीच हजार चौपालशी संपर्क साधणार आहेत. यात पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधतील. अवधमध्ये ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात अडीच हजाराहून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता जारी करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अवध येथील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. उत्तर प्रदेश भाजपने यासाठी विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींचा कृषी कायद्यांविषयीचा संदेश पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किसान संवाद आयोजित केला जाणार आहे.

Protected Content