पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस जनहिताचे कामे करून साजरा करा

 

रावेर, प्रतिनिधी । देशहिताचे निर्णय घेणारे व गरीब-गरजु जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस जनहिताचे कामे करून साजरा करायचा आहे. तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्ते,पदाधिकारी, लोकप्रतिनीधीनीं येत्या दि १४ ते दि २४ तारखेच्या दरम्यान साजरा करावा असे आवाहन भाजपा किसानसेल उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित दिनदयाल उपध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना पाटील,यांच्या अध्यक्षतेखाली रावेर कृषी उपन्न बाजार समितीला भाजपाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुरेश धनके बोलत होते.

बैठकीत जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, संजय गांधी निराधार माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, पंचायत समिती उपसभापती जुम्मा तडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सदस्य योगिता वानखडे, माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाडे, माजी जिल्हा सरचिटणीस विजय धांडे, महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, भाजपा सरचिटनीस महेश चौधरी,सी. एस. पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, महेंद्र पाटील, राहुल महाजन, भास्कर सरोदे, कैलास पारधी, नितिन पाटील आदी भाजपा पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे प्रस्तावना भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केले.

बैठकीस यांनी मारली दांडी

भाजपाच्या बैठकीला लोकप्रतिनिधी मधून जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील,पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील,पंचायत समिती सदस्य पी. के. महाजन, धनश्री सावळे, कविता कोळी,आदी लोकप्रतीनिधी बैठकीला अनुपस्थित होते.

Protected Content