मराठा समाजास आरक्षण लागू करा

 

भुसावळ, प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या केसच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिक्षण व नौकरीमध्ये तत्कालीन राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. समाजासाठी हा अत्यंत निराशाजनक क्षण असून विद्यमान राज्य सरकारने आपले शर्तीचे प्रयत्न करून मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी काम करावे, तसेच स्थगित केलेलं आरक्षण चालू कालावधी प्रभावानुसार राज्यांतर्गत लागू करावं अशी मागणी छत्रिय मराठा परिवारातर्फे बोदवड तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्या मराठा बांधवांच्या मरणाची राज्य सरकाने अवहेलना करू नये. समाजाच्या ऊद्वेगाची दखल घेऊन सरकारने तात्काळ योग्य ती पावले उचलावीत अन्यथा महाराष्ट्रात शिवप्रेमीचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा निवदेनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देतांना छत्रिय मराठा जिल्हाध्यक्ष रजत शिंदे आणि जळगाव जिल्हा विद्यार्थी प्रमुख दीपक पाटील, तालुकाध्यक्ष गजानन पाटील, तालुका कार्याध्यक्ष शैलेश वराडे , तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील, विपुल वाघ, नंदलाल पाटील, राहुल वाघ, कल्पेश वाघ, अक्षय शेळके, हर्षल पाटील, निलेश एस्कर व छत्रिय मराठा परिवार उपस्थित होता.

Protected Content