नोकरी लावण्याचा कारणावरून एकाच्या घराचे नुकसान

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेमध्ये नोकरी लावणे माझ्या हातात नाही असे सांगितल्याचा राग येऊन कल्पेश संभाजी भोइेटे (रा.दादावाडी) याच्यासह एकाने कोल्हे नगरातील मुख्याध्यापक तथा मविप्र संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक असलेले महेंद्र वसंतराव भोइेटे यांच्या घराच्या खिडक्यांसह कार, दुचाकी यांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. एवढेच नव्हे तर दोघांनी भोईटे यांच्या हनुमान नगरातील मित्राच्या घरावर सुध्दा दगडफेक करून शिवीगाळ केली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कोल्हे नगर येथे महेंद्र भोईटे हे पत्नी व मुलीसह वास्तव्यास आहेत. ते ऑर्डीनन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नोकरीला आहेत. तर जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक आहेत. त्यामुळे कल्पेश भोईटे हा त्यांना संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगत होता. मात्र, त्यास त्यांनी संस्थेत नोकरी लावणे माझ्या हातात नाही, असे सांगून नकार दिल्यामुळे त्याचा त्याला राग आला होता.

गुरूवार, ३० मार्चच्या मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास कल्पेश व त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्तीने भोईटे यांच्या कपांउंटवरील झाडांच्या कुंड्या उचलून त्या दरवाजा आणि कारच्या काचेवर आणि बोनटवर फोडल्या. बाजूला उभी मोपेड दुचाकीची सुध्दा नुकसान केले. त्यानंतर घराच्या खिड्या, नेमप्लेट, गेट लॅप देखील तोडले. त्यानंतर शिवीगाळ करून भोईटे यांना तुला डंपर खाली चिरडून टाकेल, अशी धमकी दिली. या तोडफोडीत भोईटे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले.

Protected Content