निवडणूक निरीक्षकांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

jilhadhikari news 1

जळगाव, प्रतिनिधी । निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, निवडणूका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आज निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्या कडुन कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या पुर्वतयारीचा आढावा घेतला.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदान केंद्रनिहाय नियोजनाबाबतच्या पुर्वतयारीची माहिती दिली. तसेच पोलिस अधिक्षक यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने संवेदनशील मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्ताचे केलेले नियोजन, चेकपोस्टवरील नाकाबंदी आदींच्या नियोजनाबाबतची माहिती दिली.

यावेळी निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था अबाधीत राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास देण्यात आल्या. ज्या मतदान केंद्रावर नेटवर्क उपलब्ध नाही तेथे वॉकीटॉकीसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, तसेच अशा मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवाण्याच्या सुचना दिल्यात. पोलीस चेकपोस्ट, नाकाबंदी, सीमावर्ती भागातील गस्त व तपासणी वाढविण्याच्याही सुचना दिल्या. संवेदनशील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे वेबकास्टींग करावे तसेच ज्या मतदान केंद्रावर वेबकास्टींग शक्य नसेल तेथे व्हिडीओग्राफर ठेवण्याच्या सुचनाही दिल्या. तसेच उमेदवारांच्या गावांतील मतदान केंद्रावरील सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास तेथे विशेष बंदोबस्ताचे नियोजन करावे असेही निवडणूक निरिक्षकांनी सांगितले.

या आढावा बैठकीस निवडणुक निरीक्षक रुपक मुजूमदार, श्री.नरेंद्रसिंह पटेल, पुनीत गोयल, गौरव बोथरा, निवडणुक पोलिस निरीक्षक  अहमद खुर्शीद, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजावराव उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह निवडणूक शाखेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Protected Content