Home Cities अमळनेर चक्कर येवून पडल्याने वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

चक्कर येवून पडल्याने वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दुर्गा हॉस्पिटलसमोर चक्कर येवून पडल्याने डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे एका ७१ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगलाबाई सुभाष वाणी वय ७१ रा. दुर्गा हॉस्पिटलजवळ अमळनेर असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील दुर्गा हॉस्पिटलजवळ मंगलाबाई वाणी या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. रविवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मंगलाबाई ह्या घरासमोरील रस्त्यावर चक्कर येवून पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार रिक्षा चालक शरीफ खा बशीर खाँ पठाण हे रिक्षा घेवून जात असतांना त्यांचा दिसून आले. त्यांनी तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी सोमवारी २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound