रावेर प्रतिनिधी । नोकरी देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे दाखवत १ लाख ९२ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविराधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, राहुल पुंडलिक धनगर (वय-२७) रा. कुसुंबा खुर्द यांना संशयित आरोपी दिनेश सोपान पाटील रा. वरणगाव फॅक्टर आणि रमेश विश्वनाथ सरोदे ओझरखेडा यांनी वरणगाव फॅक्टरीत नोकरी लावून देतो असे कुसुंबा येथे झालेल्या जानेवारी २०१८ मध्ये सांगितले. त्यानुसार राहुलने नोकरी मिळेल या आशेने वेळोवेळी एकुण १ लाख ९२ हजार रूपये घेतले आणि कंपनीचे बनावट पत्रक तयार करून राहुलला दिले. राहुल धनगरने कागदपत्रे घेवून गेले असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांना रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दिनेश सोपान पाटील रा. वरणगाव फॅक्टर आणि रमेश विश्वनाथ सरोदे ओझरखेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सतिश सानप, पोहेकॉ जितेंद्र पाटील करीत आहे.