कन्नड घाटात ट्रक कोसळून चालक जागीच ठार; एक जखमी

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | चाळीसगावहून औरंगाबादकडे जात असलेला ट्रक अचानक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने चालक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.

चाळीसगावहून औरंगाबादकडे जात असलेला ट्रक (क्र. केए २२ बी ७०४७) अचानक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. सलीम मुसा शेख (२३) असे ठार झालेल्या चालकाचा नाव असून बंडू भानुदास गायकवाड (३२) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही रा. उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. हि घटना कन्नड घाटातील सरदार पॉईंट ते म्हसोबा मंदिरादरम्यान १३ मार्च रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृतदेहाला क्रेनच्या सहायाने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत. तत्पूर्वी या अपघातामुळे घाटात वाहतूकीची कोंडी झाली होती. मात्र महामार्ग पोलीसांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.

 

Protected Content