पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहर व ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन मिळावे अशी मागणी बांधकाम कामगारांकडून करण्यात येत आहे. मागणी मान्य न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा कामागारांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पाचोरा शहर व ग्रामीण भागातील कामगारांची नोंद (रजिस्ट्रेशन) झालेले आहे. त्या कामगारांना भोजनाचा लाभ मिळत नसुन इतर बाहेरील राज्यातील कामगारांना मध्यान्ह भोजन मिळत आहे. तसेच या योजने अंतर्गत पुरविण्यात येणारे भोजन हे म्हशींच्या गोठ्यात दिले जात आहे. पाचोरा शहर व ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन मिळावे अशी मागणी बांधकाम कामगारांकडुन करण्यात येत आहे.
मागणी मान्य न झाल्यास अन्याया विरोधात लढा देवुन जळगांव येथील बांधकाम कामगारांचे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा शेख सईद शेख शब्बीर, अक्रम खान, अनिल बोरसे, प्रविण हिरे, किशोर वाघ (मिस्तरी), शेख अकील शेख कलंदर, सादिक शहा, शेख रऊफ शेख अहमद, शेख शरिफ शेख मुसा, रऊफ याकुब पिंजारी, शेख अयुब शेख नबी, इरफान शेख मुसा टकारी, मंजद रज्जाक टकारी, फिरोज पिंजारी, रर्ईस खान अमजद खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.