नेहरू युवा केंद्रातर्फे पराक्रम दिवस साजरा

 

जळगाव,प्रतिनिधी । थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे पराक्रम दिवस साजरा करण्यात आला.

थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे जळगावातील कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी पराक्रम दिवसबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आकाश धनगर, मेघा शिरसाठ, चेतन वाणी, प्राजक्ता भांडारकर, प्रशांत बाविस्कर आदी उपस्थित होते.

Protected Content