जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्षांची निवड झाल्याने अध्यक्षपदी रंजना पाटील यांची वर्णी लागलेली असून जिल्हा परिषद अध्यक्षांना शासकीय निवासस्थान देण्यात येते. मात्र, बंगल्यावर आज देखील अध्यक्ष म्हणून उज्वला पाटील यांच्या नावाची पाटी झळकत आहे.
रंजना पाटील यांची जि. प. अध्यक्षपदी ३ जानेवारी रोजी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्ष उज्वला पाटील यांनी रविवार १२ जानेवारी पासून अध्यक्ष यांचे शासकीय निवासस्थान खाली करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रशासनाने त्यांच्या नावाची पाटी आजपर्यंत काढलेली नाही. मावळत्या अध्यक्षांवर निवासस्थान खाली करतांना विविध आरोप होत असतांना प्रशासनाचे काम देखील आपली जबाबदारी पूर्ण पडत नसल्याचे पहावयास मिळत आहे. यासंदर्भात अध्यक्ष निवडीनंतर जवळपास १३ दिवसांचा काळ लोटला असतांना निवास्थानावर जुन्याच अध्यक्षांचे नाव असल्याने जिल्हा परिषद प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.