जळगावातील जिजामाता विद्यालयात ‘गिताई’ विषयावर डॉ. पाटील यांचे मार्गदर्शन (व्हिडीओ)

jijamata

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील न्यू जागृती मित्र मंडळ संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब जळगाव अंतर्गत 7बाय7बाय7 व्याख्यानमालेचे आयोजन आज करण्यात आले असून ‘गिताई’ या विषयावर प्रमुख वक्ते डॉ. स्मिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘गिताई’ विषयावर बोलतांना परमेश्वर प्रत्येक ठिकाणी असतो व जग त्याच शक्तीवर चालते आहे. यासाठी विविध उदा. देऊन स्पष्ट केले. पंचमहाभूत मानवता या देवानेच निर्माण केले आहेत, असे प्रतिपादन डॉ. स्मिता पाटील यांनी केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आर.खोरखेडे यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी शिक्षक किशोर पाटील, कृष्णा महाले, लता इखनकर, संगिता पाटील, शैलजा चौधरी, दिनेश सोनवणे, विकास तायडे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संजय पाटील, प्रशांत मडके, जगदिश शिंपी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी केले.

 

 

Protected Content