नितीन राऊत उपमुख्यमंत्री ?

 

मुंबईः वृत्तसंस्था । नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्या  सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार, असल्याची चर्चा आहे.

 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एकत्र भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

 

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. काँग्रेसकडील खात्यात फेरबदल झाल्यानंतर राज्य सरकारमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांची सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार, असल्याची चर्चा आहे. मात्र, नितीन राऊत उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात येईल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये.

 

नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षचा पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, हा कळीचा प्रश्न होता. शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्ष पद जाईल आणि त्या बदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असं सूत्रांचे म्हणणे आहे.

 

 

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासोबतच मंत्रिमंडळातही आपला सहभाग असावा, अशी अपेक्षा श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यानुसार सध्याच्या मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या ज्या मंत्र्याची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार आहे, त्या मंत्र्याकडचे खाते पटोलेंकडे जाणार, असेही जवळपास स्पष्ट झाले आहे.

 

Protected Content