जळगाव, प्रतिनिधी |येथे राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघात होत आहेत. एक महिन्यापूर्वी रस्ता अपघातात एरंडोल तालुक्यात ९ जणांना नुकतेच दाम्पत्य व एक नवरदेव यांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांना आळा बसावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी न्हाईच्या कार्यलयात जाऊन प्रकल्प संचालक सी. एन.सिन्हा यांची भेट घेत सोमवारपर्यत महामार्गावरील खड्डे भरले नाहीतर हात चालवू असा इशारा दिला.
शिवसेना माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह न्हाईच्या कार्यालयास भेट दिली. वारंवार निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी मालपुरे यांनी सांगितले की, आज त्यांनी कोणतेही निवेदन दिले नसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सामान्य जनेतला न्याय मिळावा या शिकवणीप्रमाणे त्यांच्या जयंतीनिमित्त न्हाईच्या कार्यलयात आलो होतो. येत्या चार दिवसात महामार्गावरील खड्डे भरले नाहीत तर शिवसेना तोंडाने बोलणार नाही तर हात उगारेल असा इशारा दिला. तसेच येत्या पंधरा दिवसात धुळे ते भुसावळपर्यतच्या महामार्गावरील साइड पट्ट्या भरल्या नाहीत तर आम्ही हात उगारू, मारू असा दम देखील मालपुरे यांनी दिला. यावेळी शोभा बारी, मनोज तिवारी, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.