Home मनोरंजन मन्या सुर्वे हा माझ्या मामाचा मुलगा ; नाना पाटेकरचा धक्कादायक खुलासा

मन्या सुर्वे हा माझ्या मामाचा मुलगा ; नाना पाटेकरचा धक्कादायक खुलासा

0
133


nana patekar
 

मुंबई (वृत्तसंस्था) मन्या सुर्वे हा माझ्या मामाचा मुलगा. पण, त्याच्याप्रमाणे आपण होऊ नये यासाठी आईने मला मुरुडला नेले होते, असा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केला आहे. मन्या सुर्वे हा कधीकाळी मुंबईतील प्रसिद्ध गुंड होता.

 

 

एका कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीत नानांना प्रत्यक्षात अशा कोणत्या मोठ्या गुन्हेगाराला भेटला आहात का? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देत, मन्या सुर्वे माहितीये? असा प्रतिप्रश्न मुलाखतकारांना केला. या प्रश्नाचे उत्तर येण्याआधीच मन्या सुर्वे हा आपला मामेभाऊ असल्याचा खुलासा नानांनी केला. तर अशिक्षित माणूस गुंड झाला तर तो परवडतो, पण सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर मात्र गोंधळ असतो, असेही नानांनी म्हटले.


Protected Content

Play sound