अमेरिकेत कोरोनाचा कहर; अकरा भारतीयांचा मृत्यू

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । अमेरीकेत कोरोनाने कहर माजविला असून अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करत आहे. तिथली आरोग्य व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. हा कसा रोखता येईल यासाठी अमेरिकेला अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. अमेरिकेत असलेल्या भारतीयांनाही या करोना व्हायरसचा फटका बसला आहे.

कोरोनामुळे अमेरिकेत आत्तापर्यंत ११ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. १६ भारतीयाचं कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत १४ हजारापेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. करोनाची लागण होऊन अमेरिकेत ज्या भारतीयांचा मृत्यू झाला आहे, ते सर्व पुरुष आहेत. मृतांमध्ये न्यू यॉर्कमधील १० आणि न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचा समावेश आहे. ११ मृतांमध्ये न्यू यॉर्कमधील चार टॅक्सीचालक आहेत.

भारताचे मानले आभार
करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले असून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटले आहे.

Protected Content