नारायण राणे यांनी मागितला उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

सिंधुदुर्ग-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृतसेवा | राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

 

नारायण राणे यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली, अशी टीका केली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला. शिवसेना सांगत होती की तीन जागा जिंकणार पण शेवटी काय झालं? संजय राऊतदेखील काठावर पास झाले. आमच्या हातून संजय राऊत वाचले. ते सत्तेत आहेत. त्यांना महाविकास आघाडीची मते मिळायला हवी होती. तेवढीही मते त्यांना मिळली नाहीत. मला सांगायचं आहे की तुम्ही अल्पमतात आलेले आहात. नैतिकतेचं भान असेल तर राजीमाना द्या आणि बाजूल व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Protected Content