गावठी पिस्तूलासह संशयित आरोपीला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आंबेडकर नगरात गावठी पिस्तूल व काडतुसासह संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील आंबेडकर नगरात सागर सुरेश सपकाळे (वय-२८) रा. कोळीपेठ जळगाव हा बेकायदेशीर हातात गावठी पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी सागर सुरेश सपकाळे यांला शनीपेठेतील आंबेकडकर नगरातून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!