घोडगावच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत  सदस्यांचा सत्कार

चोपडा : प्रतिनिधी । तालुक्यातील घोड़गाव येथे नुकताच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार चंद्रहास गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला

या ग्रामपंचायतिच्या ( २०२१ ते २०२५ ) सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या या पॅनलचे मार्गदर्शक चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदयस्यांचा सत्कार केला

घोडगावच्या प्रभाग क्रमांक १ मधून संतोष कोळी , मोनाली भोई विजयी झाल्या आहेत . आसिफ शेख यांच्या पत्नी बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र २ मधून इंदूबाई भील बिनविरोध व किशोर दुसाने विजयी झाले आहेत , प्रभाग क्रमांक ३ मधून सुनील कोळी , सुजाता पाटील विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत . प्रभाग क्रमांक ४ मधून जयवंत पाटील , विजया पाटील विजयी झाल्या आहेत .

या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे माजी सरपंच दिलीप कोळी , सुरेश मित्र मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील , जवरीलाल जैन , विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विनोद पाटील , माजी सरपंच प्रकाश पाटील , संगीता पाटील , जि प सदस्य हरिष पाटील , महेश पाटील ( बंडू नाना ) , सुनिल झिंगा पाटील , राहूल पाटील , समाधान कोळी , ज्ञानेश्वर पाटील , सुनिल पांडुरंग पाटील , संदिप पाटील , भीमराव कोळी, उध्दव पाटील, मंगल पारधी,आत्माराम भील,आदींनी या पॅनलच्या विजयासाठी परिश्रम घेतले .

Protected Content