नामदेव कोळी संपादीत वाघूर दिवाळी अंकास मसापचा पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । नव्या पिढीतील दमदार कवि म्हणून ख्यात असणार्‍या नामदेव कोळी यांनी संपादित केलेल्या वाघूर या दिवाळी अंकास मसापचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ रत्नाकर पारितोषिक हे ग्राहकहित या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत मविविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक वाघूर या दिवाळी अंकाला जाहीर झाले आहे. यासोबत मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिकफ अक्षरधारा या दिवाळी अंकाला, मशं. वा. किर्लोस्कर पारितोषिक; दक्षता या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक बिगुल या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे. जानकीबाई केळकर स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक विद्यार्थी या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे दि. अ. सोनटक्के पारितोषिक हे चपराक या दिवाळी अंकातील विद्या बायास ठाकूर यांच्या सुमी या कथेला जाहीर करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे अनंत काणेकर पारितोषिक कलासागर या दिवाळी अंकातील शिरीष पदकी यांच्या ग्रीक सॅलेड व ग्रेसच्या कविता या लेखाला जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी दिली. या स्पर्धेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १५० दिवाळी अंक आले होते. त्यातून वरील दिवाळी अंकाची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. प्रतिमा जगताप, धनंजय तडवळकर आणि श्रीकांत चौगुले यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.

Add Comment

Protected Content