नाभिक समाज संघटनेचा भरपाईसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा (व्हिडिओ)

 

जळगाव : प्रतिनिधी । राज्य सरकारकडे लॉक डाऊनच्या काळात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसह वीज बिल माफीची मागणी नाभिक समाज संघटनेने केली आहे  या मागणीची सखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे 

नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष  पृथ्वीराज सोनवणे  यांनी सांगितले कि , गेल्या वर्षभरात नाभिकांचे व्यवसाय  जवळपास  बंद आहेत . आधीच्या  लॉक डाऊनच्या काळात नाभिकांची दुकाने ८ महिने पूर्णपणे बंद  होती त्यानंतर प्रत्येकाने सरकारच्या  अटीशर्तींचे पालन करून व्यवसाय सुरु केले मात्र ग्राहक पूर्वीसारखे येत नाहीत आजही व्यवसाय मंदावलेलेच आहेत  आमची मागणी वीज बिल माफ करावे अशीही होती .  अजूनही परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही व्यवसाय ठप्प असल्यासारखेच आहेत . आता पुन्हा लॉक डाउनचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास राज्यभर नाभिक समाजाची उपासमार होईल त्यामुळे आमच्या भरपाईच्या आणि वीज बिल माफीच्या मागणीची राज्य सरकारने दाखल न घेतल्यास तीव्र आंदोलनासह प्रसंगी कठोर संघर्षाची आमची तयारी आहे

जिवा सेनेचे  उदय पवार  यांनी सांगितले की , शारीरिक अंतर पळून आणि खबरदारी घेऊन राज्यात सध्या नाभिकांनी व्यवसाय सुरु केले आहेत . ग्राहकांचा प्रतिसाद आता पूर्वीसारखा राहिलेला नाही राज्यातील सर्व दुकानदार नाभिकांना आणि त्यांच्या कारागिरांना राज्य सरकारने प्राधान्याने आणि मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली पाहिजे .

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/252482186609484

 

Protected Content