जळगाव चिंताग्रस्त : शहरात ४०० कोरोना बाधीत; जिल्ह्यात ११२४ रूग्ण !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये ११२४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरात सर्वाधीक तब्बल ४०० पॉझिटीव्ह रूग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. शहरातील वाढता संसर्ग आता चिंतेचा विषय बनला आहे.

प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ११२३ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरातील असत. जळगाव शहरात आज तब्बल ४०० पेशंट आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग आता धोक्याच्या पातळीवर पोहचल्याचे दिसून येत आहे. याच्या खालोखाल चोपडा शहरात २५६ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर आजच ९०१ रूग्ण बरे देखील झाले असून १५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच शहरातील रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव तालुका-२७; भुसावळ-१२३; अमळनेर-१५; पाचोरा-२९; भडगाव-००; धरणगाव-४८; यावल-०३; एरंडोल-२८; जामनेर-४८; रावेर-२९; पारोळा-३४; चाळीसगाव-४०; मुक्ताईनगर-२०; बोदवड-२२; इतर जिल्ह्यातील-२ असे रूग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोना आता धोक्याच्या पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने जळगाव शहरात संसर्गाचा धोका जास्त असल्याचे आज देखील आढळून आले आहे. शहरातील कान्याकोपर्‍यात रूग्णसंख्या असल्याचे आजच्याही आकडेवारीतून दिसून आले आहे. मध्यंतरी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तर आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा कर्फ्यू सुरू होत आहे. मात्र अजून देखील कोरोनाची साखळी तुटली नसून पेशंटची संख्या सातत्याने वाढीस लागल्याच स्पष्ट झाले आहे.

Protected Content