गणेश मुर्तीच्या उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुर्तीकारावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । गणेश मुर्तीच्या उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुर्तीकारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ चंद्रकांत प्रकाश वरणे या मुर्तीकाराने सार्वजनिक मंडळाकरीता लागणारे गणेश मुर्ती चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या तयार करून विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार आज ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, पोहेकॉ रमेश  चौधरी, चेतन सोनवणे, संजय सोनवणे आणि मंदार पाटील यांनी मुर्तीकार चंद्रकांत प्रकाश वरणे (वय-३८) रा. मेहरूण पाण्याच्या हौदाजवळ जळगाव कारवाई केली. पोकॉ मंदार पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content