नाथाभाऊंनी केलं चक्क फडणवीसांचं कौतुक !

मुंबई (वृत्तसंस्था) गेले चार दिवस विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. तिथे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षाची भूमिका उत्तम मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताहेत असे चित्र आहे. आम्ही विधानसभेत असतानाही अशाच पद्धतीने सरकारला जाब विचारायचो, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चक्क फडणवीसांचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे खडसेंनी अनेकदा पक्षात डावलले जात असल्याच्या मुद्द्यावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या फडणवीसांवर तोंडसुख घेतलेले आहे.

 

सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं एकनाथराव खडसे विविध वृत्तवाहिन्यांशी बोलत आहेत. परंतू यावेळी बोलतांना खडसे यांनी रिव्हर्स गेअर टाकल्याचे दिसून आले. अवघ्या काही दिवसांपूर्वी ‘पक्षात राहीन की नाही भरवसा नाही’ असा इशारा देणारे खडसे यांनी चक्क फडणवीस यांच्यासह भाजपमधील सध्याच्या नेत्याचे कौतुक केले आहे. एवढेच नव्हे, तर पक्षात न दिला जाणारा सन्मान आणि राजकारणातून बाजूला फेकले गेल्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरणारे खडसे यांनी त्यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.

Protected Content