पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाइन मागवली होती स्फोटकं ; दहशतवाद्याची कबूली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा हल्ल्यासाठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे अमोनियम नाइट्रेट, नाइट्रो-ग्लिसरीन आणि आरडीएक्स हे ऑनलाइन खरेदी करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे.

पुलवामा हल्ल्याप्रकरणी एनआयएने शुक्रवारी जैश-ए-मोहम्मद आरोपी शाकिर बशीर मागरे याला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या शाकिर बशीर मागरे याने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डार याला रसद पुरवली होती. या हल्ल्यावेळी वापरण्यात आलेले बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे अमोनियम नाइट्रेट, नाइट्रो-ग्लिसरीन आणि आरडीएक्स हे ऑनलाइन खरेदी करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती शाकिर बशीर मागरे याच्या चौकशीनंतर समोर आली आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका आतंकवाद्याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सीआरपीएफ जवानांच्या बसला टक्कर मारून अपघात घडवला होता. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले होते.

Protected Content