नशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्याची घोषणी शासनाने मंगळवारी २९ डिसेंबर रोजी घोषणा केली आहे. त्यामुळे नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द कराण्याची मागणी नशिराबादकर यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२१ सुरू आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. परंतू २९ डिसेंबर २०२० रोजी शासनाच्या नगर विकास विभागाने नगरपरिषदेची उद्घोषणा केली आहे. तसेच नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्याची विनंती केली आहे. दरम्यान उमेदवारांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण असून निवडणूक होणार किंवा नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. शासनाच्या होणाऱ्या खर्चाला आळा बसण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर माजी जि.प.सदस्य लिना महाजन, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य विनोद रंधे, सैय्यद बरकत अली युसूफ अली, देवेंद्र पाटील, अब्दुल रहिम शेख अहमद, कुरेशी शेख फिरोज शेख अब्बास, शेख मेहमूद शेख यासीन, पिंजारी अझहरूद्दीन शेख अहमद, यशवंत करडे यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/722797215328153

 

Protected Content