माजी मंत्री रामदास कदम यांच्या वक्तव्याचा पारोळ्यात निषेध

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पारोळा येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे. हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि पन्नास वर्षे शिवसेनेत होता. आपल्या अगोदरच्या नेत्याबद्दल इतके हीन स्वरूपाचे उद्गार ते कसे काय काढू शकतात! टीका अवश्य करा, परंतु काही विवेक बाळगाल की नाही? रामदासभाईंना उत्तर देताना भास्कर जाधव यांनीही आपले भान सोडले. यांच्या निषेधार्थ पारोळा येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, तालुकाप्रमुख आर.बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, उपतालुका प्रमुख दादा पाटील, जिल्हाध्यक्ष एकलव्य सेना सुनील पवार, युवासेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील, शहरप्रमुख युवासेना आबा महाजन, युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी, अल्पसंख्याक शहर प्रमुख- कलीम शेख, तालुकाध्यक्ष-व्यापारी आघाडी राजेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील, अरुण चौधरी, आप्पा चौधरी, राजू बागडे, लखन वाणी, विलास पाटील, बापूभाऊ बडगुजर, आबा सैदाने, व शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content