अडावदसह परिसरात प्रभाकरआप्पा सोनवणेंचे जोरदार स्वागत

adavad swagat

चोपडा प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांचे तालुक्यातील अडावदसह परिसरातील गावांमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फुर्त स्वागत केले.

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनावणे यांनी बंडखोरी करीत चोपडा मतदार संघात विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांनी शनिवारी अडावदसह परिसरातील गावांमध्ये प्रचार केला. प्रचारात हजारो महिलांसह ,पुरुष, तरुण मंडळी दिसत होते. अडावद गावात तर शेकडो मुस्लिमांसह इतर समाज मोठ्या प्रमाणावर होते ढोल ताश्याच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. या प्रचारफेरीत माजी आमदार कैलास बापू पाटील यांच्यासह चंद्रशेखर पाटील, हिम्मतसिंग पाटील, शांताराम आबा पाटील, आत्माराम म्हाळके, माजी पंचायत समिती सभापती रमेश आनंदा महाजन, डॉ.कासट, राकेश पाटील, गणेश पाटील, सागर पाटील, हेमंत पाटील, लक्ष्मण पाटील, सोपान पाटील गोपाल पाटील, (वडगाव ) , इकबाल खान, हर्षद खान, अझहर खान , गुलाब खान , शेख समीर, साहेब खान, सलाम गफ्फार पिजारी, शेख कालू, अझमद खान, कुर्बान शहा, मुद्साद खान,भिकन खान, भागवत पाटील, कैलास पाटील, महारु भिल्ल,राजू भिल्ल, भिकन भिल्ल, हुसेन तडवी, रशीद यामद, रविंद्र पाटील, मोहम्मद सरदार, हुसेन तडवी, जबरा सरदार,बिस्मिल्ला सारदार, दगडू पाटील, रमण पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

दरम्यान, प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी परिसरातील वरगव्हाण येथे शिव मंदिर, हनुमान मंदिर, तसेच तैबंनशहावली बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवली. तर मुक्कीशहा बाबा तसेच बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील स्वामी प्रेमचेतन महाराज यांनी प्रभाकर आप्पा यांना आशीर्वाद दिले. यासोबत त्यांनी शिव मंदिरात सुध्दा नारळ वाढवत दर्शन घेतले. दरम्यान, प्रभाकरआप्पांनी प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी वाल्मिक यांचे पुतळे व फलकांना वंदन करून जनतेला परिवर्तनाची साद घातली.

Protected Content