जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेतील नगररचना विभागात अनागोंदी कारभार सुरु आहे. या विभागात भ्रष्टाचार वाढल्याने १ वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या इंजिनिअर, अभियंते यांची बदली करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेतील नगररचना विभागातील इंजिनिअर हे ज्या प्रकरणात विशीष्ट कमाई होत नाही त्या प्रकरणात स्वारस्य दाखवत नसल्याचा आरोप छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केला आहे. तसेच अशा संबधित जागामालकांस अपमानाची वागणूक देत आहेत. विभागात धनाढ्य बिल्डर्सची प्रकरणे तीव्र गतीने पुढे सरकतात तर सर्वसामान्य नागरिकांची हेटाळणी केली जाते. अनेक इंजिनिअर वर्षानुवर्षे या विभागांत ठाण मांडून बसले आहेत. यातून भ्रष्टाचार वाढीस लागू नये यासाठी शासनाच्या कार्यप्रणालीनुसार नगररचना विभागांत १ वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या इंजिनिअर, अभियंत्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.