जळगाव प्रतिनिधी । धुळे कारागृहातून पसार झालेल्या आरोपीला जळगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली असून पुढील कारवाईसाठी आरोपीस शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, धुळे कारागृहात शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत भादवि कलम ३०२ तसेच धुळे शहर पोलीस स्टेशन भाग ५, गुरनं ११९/२०२० भादवि कलम २२४ प्रमाणे आरोपी सुरेश घुमान पावरा (वय-४०) हा धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना २२ जून २०२० रोजी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास कारागृहातून पसार झालेला होता.
आरोपी सुरेश पावरा हा जळगाव शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाताच सापळा रचून त्याला तालुक्यातील ममूराबाद बसस्थानकापासून अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीस धुळे शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बापू रोहम यांच्या आदेशाने सपोनि सुधाकर लहारे, स.फौ.नारायण पाटील, पोहेकॉ रामचंद्र बोरसे, पोना परेश महाजन, पोका. दीपक शिंदे, चालक प्रवीण हिवाळे यांनी कारवाई केली