हार्ट ऑफ गोल्ड : डॉक्टर केळकर दाम्यत्य अहोरात्र कोविडग्रस्तांच्या सेवेत मग्न

शेअर करा !

जळगाव । नवीनच विवाह झाला असतांनाही डॉ. रोहन केळकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. शाल्वी या जोडप्याने आपल्या वैवाहिक जीवनापेक्षा कोविडग्रस्तांच्या सेवेला प्राधान्य दिले असून यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

नुकतंच लग्न झालं. नवरा बायको दोन्ही डॉक्टर त्यात पहिले पोस्टिंग जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणि पोस्टिंगच्या दुसर्‍याच महिन्यात आली कोविड ची साथ

डॉ. रोहन केळकर डॉ. शाल्वी केळकर
वैद्यकीय अधिकारी कोविड रुग्णालय,
सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव

दोन्हीची ड्युटी लागली कोविड रुग्णालयात सुरवातीला जेव्हा कोरोनाची दहशत खुप होती कोणीही रुग्णाला हाथ लावायला घाबरत होता तेव्हा देखील केळकर दाम्पत्याने स्वतः रुग्णांना पुढे येऊन व्यक्तिगत तपासले , त्यांच्यावर उपचार केले.

त्यांनीही ते चॅलेंज स्वीकारले, स्वतःचा विचार न करता दिवसपाळी, रात्रपाळी अविरत सेवाकार्य सुरु ठेवले. ३-३ वार्ड चे पेशंट तपासले ७०-८० पेशंट तपासायचं कठीण कार्य त्यांनी हसत-हसत केलं आणि आजही दाम्पत्य जीवनाचं सुख बाजूला सारून ते कोरोना रुग्णांच्या सेवेत त्यांच्या उपचारात कार्यरत आहेत.

सलाम डॉ. रोहन आणि डॉ. शाल्वी व डॉक्टर्स दाम्पत्यांना त्यांनी कोरोना रुग्णांसाठी आपली लढाई पाहिल्यादिवसापासून सुरु ठेवली.

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!