नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे ऑफलाईन खंबा क्रमांक ४२८/ १०-१२ या रेल्वे रूळावर एका अनोळखी ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी शुभम विश्वकर्मा यांना गुरूवार २७ ऑक्टोबर रेाजी सकाळी ११ वाजता मिळाली. त्यानुसार त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्याला या घटनेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अतुल महाजन यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. मृतदेह तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. दरम्यान मयताची कोणतीही ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.