बेवारस गायीवर अत्यंविधी; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पुढाकार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेमंड कंपनीजवळ बेवारस असलेल्या मृत गायीवर गुरुवार २७ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या पुढाकाराने तसेच तत्परतेने अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तरुणांच्या या अनोख्या गोसेवेचे जळगाव शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

रेमंड कंपनीच्या बाजुला महामार्गाला लागुन एक गाय मृत अवस्थेत पडलेली आहे व कुत्रे त्या गाईचे लचके तोडत आहेत. अशी माहिती गुरुवारी रात्री फोनवरुन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान जळगाव जिल्हा प्रमुख गजानन माळी यांना मिळाली. माळी यांनी यानंतर बऱ्याच जेसीबी चालकांना संपर्क केला परंतु सर्व ऊद्या सकाळी येऊ असे सांगत होते. परंतु सकाळपर्यंत त्या गाईच्या देहाचे कुत्र्यांनी लचके तोडुन सांगाडाच शिल्लक ठेवला असता हीजाणीव ठेवुन माळी तीथे ऊशी व चादर घेऊन घटनास्थळावरच रात्रभर गौमातेची सेवा करण्याच्या तयारीने त्या मृत गोमाते जवळ झोपले. रात्री मदत मिळणे शक्य नव्हते, शेवटी मदत मिळावी, या मृत गायीवर अंत्यविधी व्हावा, यासाठी अखेरचा संपर्क आमदार सुरेश भोळे यांना साधला. त्यानंतर क्षणात सर्व सुत्र फिरले व मदत तत्काळ पोहचली. आमदारांनी मदतीने लागलीच जेसीबी ऊपलब्ध करून दिला. त्याच्या सहाय्याने गौमातेवर अंत्यसंस्कार करण्यात येवून शेवटचा निरोप दिला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, राज परदेशी, भरत पाटिल (बजरंगदल), सचिन पाटिल, अभिजीत बोरसे, हर्ष पुरोहित, प्रभु केदार, रूपेश मराठे, वैभव केदार, गौसेवक हजर होते.

Protected Content