तरूणाला सहा जणांकडून बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेन्डस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथे एकाने सरपंचपद रद्द होण्यासाठी अर्ज केल्याच्या रागातून ६ जणांनी बेदम मारहाण करून चाकूने हातावर वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रविवार २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा गावात राहणारे आनंद सपकाळे यांनी गावातील सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यात सरपंचपद रद्द करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. याचा राग मनात ठेवून निखिल संतोष सपकाळे, विलास नारायण सपकाळे, पुंडलिक तुळशीराम सपकाळे, प्रमोद मधुकर चव्हाण, राजू मिस्तरी आणि नारायण शंकर सपकाळे सर्व रा. कानळदा ता.जि.जळगाव यांनी आनंद सपकाळे यांचा भाचा चेतन विजय साळुंखे वय 25 रा. कानळदा ता.जि.जळगाव हा तरुण या तरुणाला छोट्या चाकूने गंभीर दुखापत केली, तर इतरांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात रविवारी २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तरुणाला मारहाण करून जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Protected Content