जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ४ था आरोग्यवर्धिनी दिन जनजागृती करून मोठ्या उत्साहात साजरा करून आला.
आरोग्यवर्धिनी दिन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले व डॉ. अजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. तसेच प्रा. आ. केंद्र धामणगाव कार्यक्षेत्रातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ममुराबाद, मोहाडी व सावखेडा बु.|| येथेही आरोग्यवर्धिनी दिन धामणगाव येथील सरपंच पती श्री गोकुळ सपकाळे, व ममुराबाद येथील सरपंच श्री हेमंत चौधरी व ग्रामस्थ यांचे उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या आरोग्यवर्धिनी दिनाची थीम “इ – संजीवनीच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्राच्या ठिकाणी टेली कन्सल्टेशन सेवा उपलब्धता” ही आहे. इ संजीवनी टेली कन्सल्टेशन ॲप्लिकेशनमध्ये प्रा. आ. केंद्र यांना स्पोक हब असे संबोधले जाते. आज आरोग्यवर्धनी केंद्रात टेली कन्सल्टेशन हब येथील वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञ/विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांची तपासणी करून आजारावर सल्लामसलत करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले, डॉ. अजय सपकाळ, औषध निर्माण अधिकारी प्रिया मंडावरे , आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, प्रतिभा चौधरी, समुह आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी विसावे, ममुराबाद डॉ. वृषाली पवार मोहाडी व डॉ. राहुल बनसोडे सावखेडा बु., आरोग्य सेवक घनश्याम लोखंडे, राहुल लाडवंजारी, आरोग्य सेविका वैशाली सपकाळे, बी. एस. करोशिया, ज्योती कंखरे, अश्विनी धनराळे, एन. बी. पठाण, गटप्रवर्तक सुवर्णा न्हावी, दीपक कोळी, सुनील कोळी, संगीता घेर व आशा सेविका कविता सपकाळे आदी सहभागी होते.