धानवडच्या माजी उपसरपंचांचा कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील  धानवड गावचे माजी उपसरपंच यशवंत (बाबा) आनंदा पाटील अर्जून (अण्णा) रामचंद्र चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

धानवड गावचे माजी उपसरपंच यशवंत (बाबा) आनंदा पाटील अर्जून (अण्णा) रामचंद्र चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी  भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालय अर्थात वसंत स्मृती येथे छोटेखानी कार्यक्रमात प्रवेश केला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, भारतीय जनता भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, ओबीसी आघाडी कोषाध्यक्ष संजय भोळे, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते ईश्वर काका मराठे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. पक्ष संघटनेसाठी जोमाने कामाला लागा केंद्र व राज्य सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवा संपूर्ण पक्ष आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी दिली.  याप्रसंगी (गोकुळ बापू) पाटील, आधार बापू पाटील, भगवान रतन पाटील, भिका पुंडलिक पाटील, नंदलाल रामदास पाटील, समाधान पाटील, गोपाल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content