धरणगाव, प्रतिनिधी । येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथिक आसैनिक ३० चे मागील महिन्यात करण्यात आले होते. त्याच प्रमाणे याचा आज दुसऱ्या टप्प्यातील वितरण आज नगरसेविका सुरेखा विजय महाजन यांच्या पुढाकाराने व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आसैनिक ३० चे या वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १ मध्ये दुसऱ्यां महिन्यांसाठी आसैनिक ३० या होमिओपॅथिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आल्या. हे गोळ्यांचे वाटप भारतीय विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख विशाल महाजन , निलेश महाजन, प्रवीण महाजन, गणेश महाजन यांनी घरोघरी जाऊन केले.