धरणगाव तालुक्यात वाढीव कापूस खरेदी केंद्राची मागणी; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात कापुस खरेदी केंद्र वाढविणे आणि मका, बाजारी, ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात एकच खरेदी केंद्र सुरू आहे. दिवसभरात फक्त २५ ते ३० शेतकऱ्याचे गाडी कापुस मोजला जातो. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याकडे कापुस शिल्लक आहे. पावसाचे दिवस तोंडावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. त्यामुळे पेरणीच्या ऐनवेळी संकटात सापडला आहे. दरम्यान कापूस खरेदी करतांना क्विंटलमागे पाच ते सहा किलो कटी लावण्यात येत ती बंद करावी, त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. खरेदी झालेल्या कापसाचे पेमेंट तातडीने खात्यात वर्ग करावी, कापूस केंद्रावर व्यापारी कापूस विकतात त्यांच्यावर कारवाई करावी, बाजार समितीमार्फत टोकण देण्यात दुजाभाव करण्यात येतो तो थांबवावा. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यात यावा, सोबत मका, बाजारी आणि ज्वारी यांची शासकीय खरेदी केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष धनराज माळी, उपजिल्हाध्यक्ष दिपक वाघमारे, नाटेश्वर पवार, मोहन पाटील, रविंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content