धरणगावात सार्वजनिक मुतारी बांधण्यासाठी नगराध्यक्षांना निवेदन

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील मराठे गल्ली, पाटील वाडा व वाणी गल्लीत सार्वजनिक नवीन मुतारी बांधण्याची मागणी रहिवाश्यांची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारात अशी मागणी नागरिकांनी नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील मराठी गल्ली, पाटील वाडा व वाणी गल्ली मधील बांधवांनी सार्वजनिक मुतारी नसल्याने असुविधा होत असल्यास ते निवेदन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना दिले आहे. या परिसरात दुसरी सार्वजनिक मुतारी नसल्याने नगराध्यक्षांनी लवकरात लवकर सार्वजनिक मुतारी उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे. नाहीतर उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनावर पाटील समाजाध्यक्ष नाना सजन पाटील, देवराम चौधरी, गोपीचंद पाटील, मोतीलाल पाटील, आबा पाटील, अशोक पाटील, सुरेश पाटील, संदीप पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content