माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचाराला प्रतिसाद; अनेक तरूणांचा पक्ष प्रवेश


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचार दौरा सुरू झाला आहे. त्यांनी जळगाव ग्रामीणमधील गावांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देवकरांना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा, विवरे गावात भेट दिली. यावेळी पक्षाचे सर्वासर्वे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भवरखेडा व विवरे गावातील परिसरातील अनेक तरुणांनी शरद पवार पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे.

दरम्यान, यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सर्वांचे स्वागत करत गळ्यात गमछा घालून प्रवेश दिला आहे. यावेळी घोषणांनी परिसर जणांना सोडला होता. दरम्यान त्यांनी छोट्या खानी सभेत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गावाच्या विकासासंदर्भात ग्वाही दिली. तसेच विद्यमान मंत्री हे गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहे. या काळात अनेक विकास कामे झाली शिवाय त्यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग देण्यात आला आहे. स्वतःला पाणीवाला बाबा बनवणारे मंत्री यांनी धरणगाव शहरात पाणीपुरवठा संदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नाही, आजही धरणगाव शहरात तब्बल २२ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जनता ही त्रस्त झालेली आहे, त्यांना परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे आता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकास कामांना गती मिळणार, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, मोहन पाटील, दिलीप धनगर, दिनेश भदाणे, जिभाऊ माळी, किरण माळी यांच्यासह भवरखेडा व विवरे गावातील ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.