मुक्ताईनगर विधानसभेसाठी काँग्रेसची भूमिका जाहीर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीसंदर्भात राष्ट्रीय काँग्रेसने महाविकास आघाडीच्या शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठीची भूमीका स्पष्ट केली आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. रोहिणी खडसे ह्या शरद पवार पक्षाकडून मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा निवडणूक लढवित आहे. गेल्या काही काळात मुक्ताईनगर मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू होते. त्यावर काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करत आपण महाविकास आघाडीसोबत असून दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच आता काँग्रेसचे बोदवड येथे आढावा बैठक घेतली असून बोदवड येथून प्रचारात सहभाग घेणार असल्यासची भूमीका स्पष्ट केली.

या बैठकीत माजी आमदार गुलाब रजा, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, निरीक्षक ज्ञानेश्वर कोळी, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, मुक्ताईनगर प्रभारी हरिश गनवाणी, सहनिरीक्षक वीरेंद्रसिंग पाटील, रावेर तालुकाध्यक्ष महिला सेवा दल डॉ ऐश्वर्या राठोड यांच्यासह मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुकाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित होते. मुक्ताईनगर विधानसभा काँग्रेस आढावा बैठकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागासाठी सर्वांनी कामाला लागा असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून निरीक्षक माननीय गुलाम रजा साहेब व जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार यांनी दिले आहे.

Protected Content