धरणगाव, प्रतिनिधी | येथे सरपंच परिषदेची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. यात तालुकाध्यक्षपदी माजी सरपंच निर्दोष पवार तर उपाध्यक्षपदी सरपंच सचिन बिराडे यांची निवड करण्यात आली आहे.
धरणगावात सरपंच परिषदेची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्याअनुषंगाने तालुकाध्यक्षपदी माजी सरपंच निर्दोष पवार तर उपाध्यक्षपदी सरपंच सचिन बिराडे यांची निवड करण्यात आली आहे. यानुसार सरचिटणीस पदी पष्टाणे येथील माजी सरपंच किशोर पाटील, महिला तालुकाध्यक्षपदी नांदेड येथील सरपंच पुनम प्रशांत अत्तरदे, महिला उपाध्यक्षपदी पिंपरी येथील सरपंच सरला बडगुजर, सरचिटणीस पदी चिंचपूरायेथील सरपंच आशाबाई पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई देसले, जिल्हा समन्वयक श्रीकांत पाटील, जिल्हा समन्वयक बाळू चव्हाण यांनी घोषणा केल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरपंच परिषद मुंबई ही सदैव राज्यातील व जिल्ह्यातील सरपंच यांच्या सदैव सोबत राहील असे सांगितले. दरम्यान आपल्या गावाचा तालुक्यातून जास्तीत जास्त विकास करून तालुक्यात प्रथम क्रमांकावर आपल्या गावाला नेले असे नवनिर्वाचित सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांच्या अनुभव तालुक्यातील अनेक सरपंचांना कामी आल्याशिवाय राहणार नाही असे सांगून जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई दिसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला सरपंच यांना गाव गाडा चालवत असताना अनेक अडचणी येत असतात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महिला म्हणून सरपंच परिषद सदैव सरपंच यांच्या पाठीशी राहील असे सांगितले.
याप्रसंगी सळवाचे सरपंच निशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सरपंच सरला बडगुजर, सचिन बिराडे, धाड शेरी चे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील, चिंचपूर येथील कैलास पाटील, अनोरे येथील सरपंच स्वप्नील महाजन, बाबुळगाव चे सरपंच राजूभाऊ पाटील, विशाल पाटील, बोरखेडा येथील उपसरपंच डॉ. विजय पाटील, अंजन्विहिरे येथील सरपंच डॉ. विलास चव्हाण, अहिरे येथील माजी उपसरपंच पवन पाटील, गुलाब पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलास भिल , आशा कोल्हे, मामी पटेल अनेक सरपंच उपस्थित होते. यावेळी अनोरे चे सरपंच स्वप्नील महाजन, किशोर पाटील, सचिन बोराडे, कैलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले.