धरणगाव (प्रतिनिधी) शहरात आज मुंबई येथून दाखल झालेल्या तरुणाची शासनाच्या निर्देशाप्रमाणे म्हणून तपासणी करण्यात आली आहे. थोड्या वेळानंतर त्याला जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील तपासणीसाठी रवाना करणार आहेत. बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची नियमित तपासणी सुरु आहे, यात नागरिकांनी घाबरण्याचे गरज नसल्याची प्रतिक्रिया डॉ.अभय गोदने यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली आहे.
धरणगाव येथे आज रोजी पुणे येथून एक तरुण आला होता. या तरुणामध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत किंवा नाही? हे अद्याप कळू शकले नसले, तरी संभाव्य धोका लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय गोदने यांनी तरुणास पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्याच्या सूचना केल्या आहेत. तूर्त त्या तरुणास आयसोलेट वार्डमध्ये ठेवलेले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्यधिकारी जनार्दन पवार, एपीआय पवन देसले, विनोद रोकडे, अमोल चौधरी, किशोर खैरनार यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील सुविधांची माहिती घेतली. दरम्यान, हा प्रकार कळाल्यानंतर गावात चर्चेला उधान आले होते.