धरणगाव (प्रतिनिधी) शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील हॉटेल बाबलामध्ये चढ्या दराने मद्यविक्री होत असल्याचे स्टिंग समोर आल्याच्या वृत्ताची नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित हॉटेलवर २४ जून रोजीच विभागीय गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे.
शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील हॉटेल बाबलामध्ये चढ्या दराने मद्यविक्री होत असल्याची धक्कादायक गोष्ट २० जून रोजी उघडकीस आली होती. विशेष म्हणजे एका ग्राहकानेच याबाबत स्टिंग ऑपरेशन करून कशा पद्धतीने ग्राहकांचा खिसा कापला जातोय, हे उघड केले होते. एवढेच नव्हे तर ना मास्क, ना निर्जंतुकिकरण आणि ना परवाना बघता दारू कशी विक्री केली जात असल्याचेही या स्टिंगमधून उघड झाले होते. या वृत्ताची नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ सोबत बोलतांना श्री.ओहोळ यांनी सांगितले की, हॉटेल बाबलावर २४ जून रोजी विभागीय गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात झाली आहे. तपासाअंती योग्य कारवाई केली जाईल. तसेच नाशिक विभागातील ज्या-ज्या गोष्टी निदर्शनास येत आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. दरम्यान, श्री.ओहोळ यांनी कागदपत्रांची तपासणी करत असतांना परमीट रूममध्ये दारू पिणाऱ्या राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहीवडे यांच्या तडकाफडकी निलंबनाचे आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले होते.
संबंधित वृत्ताची लिंक