धनाजी नाना महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण उत्सव समिती व  राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान  इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे यांच्या हस्ते व भारताच्या पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उपप्राचार्य प्रा.विलास बोरोले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवनावर भाष्य करत मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना सहायक अधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी यांनी केले. प्रसंगी महविद्याल्यातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.

 

Protected Content