शेतात कापून ठेवलेल्या मक्याला आग, ८० हजारांचे नुकसान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आव्हाणे शिवारात असलेल्या शेतात अचानक आग लागून शेतात कापून ठेवलेला तब्बल 80 हजारांचा मका जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवार, ३० ऑक्टोंबर रोजी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे चंद्रकांत निळकंठ पाटील वय ३५ हे शेतकरी राहतात. ते गेल्या चार वर्षापासून आव्हाणे शिवारात चंद्रकांत राजाराम खडके यांची शेती नफयाने करीत आहेत. या वर्षी शेतात मका लावला आहे. २९ ऑक्टोंबर रोजी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या शेतातील मका कापून ठेवला होता, यात कणीसाचा ढीक करुन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गुळ लावून मक्याचा कडबा ठेवला होता. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास चंद्रकांत पाटील हे नेहमीप्रमाणे शेतात आले असता, त्यांना मका जळालेला दिसून आला. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही, मात्र या अचानक लागलेल्या या आगीचत चंद्रकांत पाटील यांचे ८० हजार रुपयांचे मक्याचे कणीस जळून नुकसान झाले आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी रविवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहेत.

 

Protected Content